if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

श्रीहरी विठ्ठल

  हरी हरी श्रीहरी पळाला कुठे श्रीहरी,

शोधती वैष्णव मंडळी, पंढरीच्या रणातूनी.


इथे शोधू  की तिथे शोधू , पंढरीच्या रायाला.

शिणोठा घालवाया देव गेला ,नंदवाळ नगराला,


रात्रीचे बारा वाजता, दाराची कडी गाजता  .

राई म्हणे रुक्मिणीला ,कोण ग पाहुणा  आला.


 दारी उभा विठ्ठल पाहून, हर्ष झाला मनाला .

सेवेशी सिद्ध जाहल्या, अष्टनायका.


रुक्मिणीने घातला पलंग, अंथरूण घातले राईन.

वारा घाले लुमावती, पावले चेपती जांबुवंती .


सेवा करत  चालली रातराणी सरत.

सोडायचा नाही नाथ आता, काहिकेल्या परत .


नंदवाळ नगरात, करवीर क्षेत्रात .

विसावा घेतो जगाचा जगन्नाथ .


पहाट समई धुंद गारवा सुटला.

साखरझोपेत गेल्या अष्टनायक .


पंढरीच्या रणातून पहाटे हाक आली विठ्ठला .

जगत राजा चालला पुन्हा वैष्णव भेटीला.


प्रभात समयी जाग आली अष्टनायका .

शोधा शोध घेत चालल्या चहू मुलखा .


रुक्मिणी काढे समजूत सर्व बायांची.

रात्री बारा वाजता कडी गाजेल परत दाराची .


निशिकांत हारुगले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी. किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी. तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार. वाटले तुझ्या...