if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

बेधुंद हवेच्या बहरातूनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बेधुंद हवेच्या बहरातूनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

बेधुंद हवेच्या बहरातूनी

 बेधुंद हवेच्या बहरातूनी,


बेधुंद हवेच्या बहारतूनी, 

बोलती श्वास बंधने ही.

येऊनी तू या सांजवेळी, 

गूज बोलावे या कानामधी.

विरहानल्या या वेड्याजिवा, 

सुखावते तुझी नेत्र पालवी.

तापला तो रवी जातो ,जळा खालच्या घरी.

बसुनी छेडीतो झंकार मी,

शीतल या संध्येवेळी.

माझीच तू सखे साजणी,

या हृदयाची तू स्वामींनी.

बेधुंद हवेच्या बहरातूनी…


केलेस तू मदहोश मला,

दाखवुन तुझी मंद स्मित ही.

येतेस का सांजवेळी या,

भेटायला त्या बकुळी खाली.

सुचेल धुंद तराणे मज,

गाण्यातले तुला पाहता गडे.

बेधुंद हवेच्या बहरातूनी… …


मी दिलेल्या धुंद मोग्ऱ्याचा,

वास आठवतो का सांग तुला.

माळलेला तो गजरा पाहून,

वेड्या झाल्या माझ्या आशा.

होकार मज कळला तुझा,

काही न बोलता त्या अधरातून.

बेधुंद हवेच्या बहरातून … …


वेडावल्या या सागरी लाटा,

गाज सुमधुर बोलती त्या.

वेड्या होऊन येती भेटायला,

त्या अबोल कातळ किनाऱ्याला.

तशीच ये सखे साजणी,

भेटायला या कातर वेळी.

सामावून घेईन तुला ग मी,

त्या दंतुर किनाऱ्यापरी.

बेधुंद हवेच्या बहरातुनी… …

कवी - निशिकांत हारुगले

पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी. किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी. तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार. वाटले तुझ्या...