if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

पारध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पारध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

पारध

 कोदंडावरी प्रत्यंचा चडवूनी निघाला तो रानी

मावळ हाती तयाच्या शर  तो काळ रुपी.

नयनातुनी उसळे त्याच्या अनलाच्या ज्वाला,

कार्मुकाशी करत चालला तो पारधी चाळा ,

अरण्याचे रान चालती पद ते जोरात,

मृत्त्यूदेवता  चालती मागोमाग वेगात.

दृष्टास दिसतसे दृष्टच सृष्टी सारी ,

निसर्गाचे सौदर्य नच डोळा पाही.

सुंदर वेली लता बहरती रानावनात,

मधुर विहग गोडवा घुमतसे कानात.

त्याला न भान या सुंदरतेचे,

दुष्ट नयन शोधती पारध आकाशीचे .

निर्जन स्थळी थांबले चरण काळाचे,

सामोरी दिसे आम्रवृक्षी पारध द्विजाचे.

चढली प्रत्यंचा कोदंडी तीव्र शराची ,

निघाला तो तीर शिकारण्या द्विजाची .

फडफड करत कोसळला खाली द्विज,

एकच कल्लोळ माजला नभी पक्षांत.

क्रूर  हास्य उमटले त्याच्या गालावरती,

पारध यशस्वी जाहले वाटले शिकारी.

भुवरूनी उसळला पुन्हा द्विज,

आयुष्य उपभोगण्या निघाला आकाशात.

पुन्हा वेधण्या प्रत्यंचा ताणली गेली तेव्हा,

सळसळत येऊनी डसाला अही पायात.

पारध करण्या आला होता तो पारधी रानी,

स्वत पारध होऊन गेला यमलोकी.


निशिकांत हारुगले










पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी. किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी. तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार. वाटले तुझ्या...