तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी.
किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण माझ्या करी.
तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार.
वाटले तुझ्या सारखा विश्वासू , न मिळेल मज जोडीदार.
जाऊ भटकू रानामध्येे , दूर दूर मैदानावर.
आपली मैत्री जमेल पक्की, जसे धरणी आकाश क्षितिजावर.
आकाशीचा फिरता वारा , आहे खट्याळ फार.
तुला सांगेल जाऊ दूरवर, फिरत फिरत गगनपार .
एके दिवशी अवचित घडला, एक चमत्कार.
मैदानाच्या अंगणात, तुज भेटला साथीदार.
तुज म्हणाला कैदी होऊन, कशाला भोगतोस तुरुंगवास.
दुसऱ्याच्या हातची कठपुतळी होऊन, नाचत जाईल आयुष्यपार
चल एकमेका मदतीने तोडू बंधने ,
मुक्त होऊन फिरत राहू, आकाशाच्या सदने.
साथी मिळताच तू तोडला मैत्रीचा अपुला धागा .
मज सोडून निघालास आकाशीच्या अंगणा.
तू पण निघालास स्वार्थी माझ्या सवंगड्यांपरी.
मज सोडून निघून गेलास दूर गगनापरी .
गेलास म्हणून नाही खचनार मी .
माझे आयुष्य आनंदाने जगणार मी.
निशिकांत हारुगले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा