if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

प्रणय गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रणय गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

प्रणय गीत

 प्रणय गीत

झिम्माड पाऊस चिंब भिजवून शहारे आणि अंगा,

आठवण येते तुझी साजना या श्रावण दिवसा.

म्हणूनच आलो तुझ ओढीने भेटाया साजणी,

उनपावसाच्या सरीत जाऊ चिंब भिजूनी.


टप टप वाजूनी टपोरे थेंब काय सांगती बोलणं,

तुझ्या नि माझ्या प्रीतिसंगम भेटीचे मधुर गीत असेना.

फुलवून पिसारा मयुर नाचतो रानावनातून,

तयास पाहून शिरशिरी भरते लांडोरीस लाजून.


पावलातील नुपूर सांगती अनुरागाचे गीत,

त्या गीताच्या तालावर ती हृदय माझे डोलल.

कोगुळ बोले कुहूकुहू काय सांगतो कानात,

तुझ्या नि माझ्या मिलनाचा आला सोनेरी हा क्षण.


नजर भिडता नजरेस भिजल्या देहाची आरपार,

असा क्षण ना पुन्हा सखये जवळी ये लाजून.

गर्जून सांगे मेघराज मज पाऊले टाक तू जपूनी,

घाबरु नको सखये साजणी वरीतो आज तुला मी.


असे अनोखे मिलन झाले अशा कोणत्या क्षणी,

आकाशातून टाके मंगल अक्षता पानकळा डोईवरी.

असेच प्रेम करशील सखया मजसवे जीवनात,

म्हणूनच अर्धांगी करून नेईतो  मी घरास.

 कवी- निशिकांत हारुगले

पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी. किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी. तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार. वाटले तुझ्या...