if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

प्रेमगीत १ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमगीत १ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

प्रेम गीत १

 प्रेम गीत १

कवी : निशिकांत हारुगले

तांबूस निळ्या डोंगर कपारी, फुलली नाजूक वेल कशी.

घाटोऱ्या कातळ रानातून, वहाते जशी नागमोडी झरी.

पांडूर रंगांची रांगडी वेत, ही कटेल मला कशी.

होऊन राणी करेल, राज कवा माझ्या हृदयावरी.


अरे, जा ही घाटोरी कारवी रानातली हाय,

तुझ्या गोड गोड भुलण्याला फसायची नाय.


मनाने प्रामाणिक असणारा, माझ्यावर प्रेम करणारा,

कष्टाची भाकर खाणारा, माझ्या मनावर राज्य गाजवणारा,

असा असेल माझा घरधनी, मी होईन त्याची राणी.


कष्टाची भाकर मिळविण मी, महाल सुंदर बांधीन मी.

तुला राणीवाणी ठेवूनी ,बुलेटवरून फिरविन मी.

शिव चरणाची आन, भगव्या पतकेचा मान.

सुखी स्वराज्याची शान, तुला सुखात ठेवीन ग, राणी सुखात ठेविन ग.


तुझ्या शराला मी र गावायची नाय. वाघीण ही घाट कुंतलाची हाय.

अरे, जा ही घाटोरी कारवी रानातली हाय.

तुझ्या गोडगोड बोलण्याला फासायची नाय.


मल्लखांबी कसरत करणारा, व्यसन वाईट न करणारा.

वेताची काठी फिरविणारा, अचूक संधान साधणारा.

गर्व कधी न करणारा, सगळ्याच्या कामी येणारा.

उद्योग स्वतःचा उभारणारा, आहे रांगडा मावळा मी.


माझ्या मागं लागल्यात शंभर पोरी,

परी जीव माझा जडलाय तुझ्यावरी.

होकार दे आता लवकरी, नाहीतर निघालो माघारी.


नको रे जाऊ माघारी, घाल देवाच्या साथीनं मंगळसरी.

करून मला रे तुझी जाया , नांदाया ने रे तुझ्या घरी.


जोडी ही रांगडी जमली ही, आशीर्वाद द्या हो मंडळी.

सुखाचा संसार कराया, वरात चालली सासरी.

कवी. : निशिकांत हारुगले

पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी. किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी. तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार. वाटले तुझ्या...