कंठातूनी प्रकटले ओंकार स्वरुपात,
श्रीगणेशा करून करू तयाची सुरवात.
प्रकटले ते स्वर मंजुळ मुख कमलातून,
दंततालव्य वाजवीत जिव्हा करे साथ.
यावे शारदे स्वीकारावे माझ्या पूजेस,
आशीर्वाद देऊनी तारावे निज भक्तास.
करातील करंगळी करते वाकुनी तव मुजरा,
तयावरती स्वार झाला मरंगळीचा फेरा ,
अंगठ्यासवे अनामिका तिज साथ मधल्याची ,
मोरपीस शोभते तयाचेया करी .
प्रकटली ताडपत्रावरती तू शारदादेवी .
बुध्दीदेवता आदेश देते ती ब्रम्हस्वरूप ,
कसे सत्य चिरकाल टिकावे या विश्वात,
जाहले बंधिस्त श्रेष्ठ ज्ञान त्या ग्रंथात,
उघडताच पाने प्रकटावे तत्पर जगात .
ज्ञानाच्या गोणी लादाव्या पाठीवरी ,
तरुण जाऊ हा संसार मोह मायारुपी ,
तुझी साथ आम्हा असावी नित्यनेमाने,
सेवा घडावी तुझी प्राणपणाने ,
घडो जीवनी जीवन ज्ञानाने .
निशिकांत हारुगले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा