आकाशी चांदवा प्रकटला कोजागिरी पूनवेचा ,
अम्हासवे टिपऱ्या खेळतो नाथ पंढरी नगराचा.
भिमेतीरी जमली वैष्णव मंडळी,
आम्हीं भोळ्या मराठमोळ्या पोरी .
आम्हा फसवू पाहू नको तू केली गोकुळात चोरी,
गोडगोड बोलून लोणी खाऊन केलीस शिरजोरी .
दिसतोस सावळा, साळसूद भोळा, आहेस रे लबाड .
आम्हा गोपींजवळ बागितलेस तू दूधा लोण्याचे घबाड .
वाजवून पावा प्रेमाचा चाळा फसवतोस तू सर्वांना ,
असेच फसवून वरीलेस तू, आमच्या भोळ्या रुक्मिणीला.
रुसला ग नाथ वाटत बाई, आमच्या कडू बोलण्याला .
चला समजूत काढू त्याची, खेळूनी रासलीला .
वाजावा सुमधुर पावा बाई भीमेच्या रणात,
रास रंगावा टिपऱ्या टाळा सवे पंढरीत .
कानात कुंडल डोईत मोरपीस दिसतो साजिरा सुंदर
देखणा ग बाई गोजीरा , आमचा रमेचा वर,
भरीले रांजण दुधाचे बाई त्याने प्रेमाच्या सागरात ,
प्रेमाची भरती आली हो भामाबाईला ,
रासाच्या रंगात दुधाच्या रांजनात उतरला चांदवा नभीचा,
लुटुया क्षीराचा आनंद कोजागर पूनवेला.
निशिकांत हारुगले