हरी हरी श्रीहरी पळाला कुठे श्रीहरी,
शोधती वैष्णव मंडळी, पंढरीच्या रणातूनी.
इथे शोधू की तिथे शोधू , पंढरीच्या रायाला.
शिणोठा घालवाया देव गेला ,नंदवाळ नगराला,
रात्रीचे बारा वाजता, दाराची कडी गाजता .
राई म्हणे रुक्मिणीला ,कोण ग पाहुणा आला.
दारी उभा विठ्ठल पाहून, हर्ष झाला मनाला .
सेवेशी सिद्ध जाहल्या, अष्टनायका.
रुक्मिणीने घातला पलंग, अंथरूण घातले राईन.
वारा घाले लुमावती, पावले चेपती जांबुवंती .
सेवा करत चालली रातराणी सरत.
सोडायचा नाही नाथ आता, काहिकेल्या परत .
नंदवाळ नगरात, करवीर क्षेत्रात .
विसावा घेतो जगाचा जगन्नाथ .
पहाट समई धुंद गारवा सुटला.
साखरझोपेत गेल्या अष्टनायक .
पंढरीच्या रणातून पहाटे हाक आली विठ्ठला .
जगत राजा चालला पुन्हा वैष्णव भेटीला.
प्रभात समयी जाग आली अष्टनायका .
शोधा शोध घेत चालल्या चहू मुलखा .
रुक्मिणी काढे समजूत सर्व बायांची.
रात्री बारा वाजता कडी गाजेल परत दाराची .
निशिकांत हारुगले