if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

प्रेम



हृदयदी भाषा ते हृदयची जाणते,

प्रीत ही माझी तुझवर येऊनी थांबते .

कसले हे अमोघ बंधन आहे ना ,

सारे म्हणतात ते प्रेम हेच का.


नयनातूनी जुळवी ते अनोखे बंध ,

कुसुमातुनी पसरावा प्रीतीचा सुगंध .

तसे दळवळावे आपले जगात जीवना,

प्रेम म्हणतात ते हेच का?


अणु अणु मधूनी घडावे विश्व ,

चरा चरातून जोडत जाई अनुबंध ,

अग्नीत जाळूनी दाखवावे अमरत्व .

दिपावरील श्रेष्ठ पतंग्याचे हे प्रेम .

कसले हे बंधन प्रेमा?

सारे म्हणतात ते प्रेम हेच का?


कसा सुटावा विपणी सुगंध कस्तुरीचा ,

वेड लागूनी धावावा मृग तो मनीचा ,

अंत करून सोडते तेच का ?

शेवट हा प्रेमाचा असा का ?


वेड लावते पद्मज कृष्ण वर्णी भुंग्याशी,

जाळ्यात अडकुनी आपल्या स्पंदने घेई हृदयाची.

काष्ट फोडणारा अडके नाजूक बंधासी ,

गुदमरून जाऊन देई बाजी प्राणांची .

असले कसले हे बंधन प्रेमा ?

शेवट व्हावा जगण्याचा असा का ?


प्रेम नव्हे जगणे नी मरणे ,

प्रेम त्यागाच्या यशाचे आहेत निखारे ,

प्रेमातून वाढे वंश जीवनाचे ,

नव्हे वासनेचे बंध प्रेमा?

त्यागाने येई अमरत्व प्रेमाला.


निशिकांत हारुगले








जय गोदावरी

 जय  जयतू  गोदावरी देवी महाराष्ट्र माता,

सह्यगिरी गिरीवर पुत्री नमन तुज आता.

जय देवी गोदावरी दख्खन पथ गंगा  ll



गोपाप क्षालना आणीली तुज गौतमाने,

साळी उगवून अनेक जीव रक्षिले तयाने.

दंडकारण्य सुशोभित करत चालली वेगाने,

त्र्यंबकेश्वरीची  नागीण धावते जोराने  ll


शुरपणकेचे नाक छाटीले तुज काठी लक्ष्मणाने,

रामायणाचा अध्याय घडला तुझ्याच तिराने. 

      जळा जळातून उभारले तुझ्या अनेक संत,       

          समानतेचाेचा संदेश देती एकनाथ ll


मराठवाडा सजवत चालली देवी,

सुखात जा तू नांदण्या तू आंध्रप्रदेशी.

खुणावून बोलावे तुझ बंग सागर ,

तोच तुझा पती परमेश्वर ll


नांदूनी तुज आठवण येईल माहेरची,

 बाष्प रूप घेऊन भेटाया ये सह्याद्रीच्या मुलखी ll

निशिकांत हारूगले






वैशाख मास

 गेला फाल्गुन मास , सरले चैत्राचे दिस,

ग्रीष्माचे उन घेऊनी आला वैशाख मास.


पूर्वक्षितीचा रविराज आकाशी झळकला,

तरूची हिरवी दुलई घेऊनी गेला.


पिवळ्या पिवळ्या फुलांची नक्षी रानी सजली, 

प्रणयप्रर्भेचा रंग सगळीकडे उधळू लागली.


कलकलाट चालला भोर्ड्यांचा मेसात,

मोरांचा केकारव ऐकू येई रानात.


तहानलेल्या धरणीला मोठ्या मोठ्याल्या चिरा ,

तृप्त करण्या येशील वरूनिराजा रे केव्हा.


ग्रीष्माच्या वणव्यात आमराई बहरली,

पाना पाना आड आम्रकैरी दडली. 


लपत छपत जाऊन कैरी पळवावी, 

आंबट गोड आंब्याची चव चाखून पहावी. 


असा वैशाख मास पुन्हा पुन्हा यावा ,

सुख दुःखाचा संदेश घेऊनी जावा.


निशिकांत हारुगले 


पारध

 कोदंडावरी प्रत्यंचा चडवूनी निघाला तो रानी

मावळ हाती तयाच्या शर  तो काळ रुपी.

नयनातुनी उसळे त्याच्या अनलाच्या ज्वाला,

कार्मुकाशी करत चालला तो पारधी चाळा ,

अरण्याचे रान चालती पद ते जोरात,

मृत्त्यूदेवता  चालती मागोमाग वेगात.

दृष्टास दिसतसे दृष्टच सृष्टी सारी ,

निसर्गाचे सौदर्य नच डोळा पाही.

सुंदर वेली लता बहरती रानावनात,

मधुर विहग गोडवा घुमतसे कानात.

त्याला न भान या सुंदरतेचे,

दुष्ट नयन शोधती पारध आकाशीचे .

निर्जन स्थळी थांबले चरण काळाचे,

सामोरी दिसे आम्रवृक्षी पारध द्विजाचे.

चढली प्रत्यंचा कोदंडी तीव्र शराची ,

निघाला तो तीर शिकारण्या द्विजाची .

फडफड करत कोसळला खाली द्विज,

एकच कल्लोळ माजला नभी पक्षांत.

क्रूर  हास्य उमटले त्याच्या गालावरती,

पारध यशस्वी जाहले वाटले शिकारी.

भुवरूनी उसळला पुन्हा द्विज,

आयुष्य उपभोगण्या निघाला आकाशात.

पुन्हा वेधण्या प्रत्यंचा ताणली गेली तेव्हा,

सळसळत येऊनी डसाला अही पायात.

पारध करण्या आला होता तो पारधी रानी,

स्वत पारध होऊन गेला यमलोकी.


निशिकांत हारुगले










मराठी बोली

 थाट पहावा मराठीचा प्रांता प्रांतातून,                                

 अनेक उगवी बोल ते दहा कोसातून,

राहणे बाई माझे सागर शेजारात,सह्याद्रीच्या पश्चिम तिरात,

नासिक रंजन बोली ही , नथ बोले वरखाली होऊनी.

अशी आमची सुंदर कोकणची बोली,

मालवणच्या सिंधूदुग् पासून ठाणे करी.

थाट पहावा मराठीचा... ...l l


अपरांत देशातून निघालो पूर्वेच्या कडा

नांदण्या मराठी निघाली घाटाच्या देशा,

तलवारीची जात माझी मी दिसते नाजूक,

भगवी पताका फडकते कुंतल देशात,

घाटीचा हा थाट पहावा रांगड्या मुलखात,                    

शिवशाहीचा भगवा डोलावा सह्याद्री शिखरात.

अशी आमची सुंदर साजिरी घाटोरी बोली,

मलप्रभे पासून नांदते भीमेच्यातीरी.

थाट पहावा मराठीचा... ...ll


उभी राहते मी हो बाई शाळूच्या  रानात,

देवगिरीचा किल्ला शोभे मराठवाड्यात,

घडावा कलेचा साज बाई पैठणी शालुवरती,

अशमक खोऱ्याची आहे मी महाराणी.

अजंठा वेरूळ ची कला पहावी गोदेच्या खोऱ्यात,

अशी सुंदर साजिरी बाई मराठवाडी बोल

तूरा खोवतो मानाचा किल्ले देवगिरीवर 

थाट पहावा मराठीचा... ... .ll


झुळ  झुळ वाहे पाणी तापी पूर्णेचे,

केळयांची बाग बहरली जळगाव प्रांते ,

बहिणाईची गीत सांगती मराठीचा ढंग,

मराठीचे उत्तर टोक अहिराणी बोल,

तापी पूरणेच्या पाण्याचा पडावा मुक्तनगरी वळसा,

चांगदेव मुलखाचा थाट पहावा अहिरान खानदेशा.

अशी सुंदर साजिरी अहिराणी बोल,

मराठीचा तुरा खोवते बऱ्हाणपूर सीमेवर

 थाट पहावा मराठीचा... ...ll


सातपुड्याच्या मुली नांदती विदर्भ खोऱ्यात

वैना वर्धाचे सुंदर खोरे चंद्रपुरात,

धानाची ती पात डोलते भंडार प्रांती,

कपाशीची बोंडे खुलती नागपूर देशी,

नांदते बाई मी रूक्मिनीच्या  माहेरी,

मराठीची लाडकी लेक माय मी वऱ्हाडी.

थाट पहावा मराठीचा... ...ll


नांदते मी अपरांतपासून  विदर्भ प्रदेश 

कुंतल पासून थेट अश्मक  देश

गावरान बोल जरी वाटती अहो आम्ही ग्रामवासी

मराठीच्या आम्ही मुली नांदतो महाराष्ट्र राज्यी

थाट पहावा मराठीचा... ...ll


निशिकांत हारुगले













भामा

 तुझ्या प्रीतीने वेडी होऊन धावते रे देवा,

दर्शनाने कृतार्थ करा या वेड्या जीवा.

घेऊनी उडी सह्यद्री शिखरावरुनी,

 व्हळ होऊनी नीर रूपाने आले तव चरणी,

देवा आले तव चरणी.

भीमथडीच्या तटामधुनी. उसळे मज  नीर

दर्शना तुझीया आले देवा सत्यभामादेवी ,

रासलीला यमुनाजळी ,माझ्या तीरी वैष्णव मेळा,

कारे अव्हेर माझा केशवा,एकदा तरी यावे माझ्या तीरा,

करीन सेवा तुझि रे मी प्राणपणाने.

आकाडात वरुण कृपा करता,मज सव्रागा  भरती येते 

तूझ्या दर्शना आडवती मज तुझे हे वेडे. वैष्णव भक्त,

ही सारी रे तुझीच लीला,मी ओळखते तुझा कावा.

कितीतरी बांधणे घाला तरी नित्य कलशातूनी दर्शना

येईल माझे जल मंदिरा,

उतरतील त्या जळधारा,  तव अंगावरती  .

 स्नान घालूनी निर चालले, भूमातेच्या उदरी,

निरोप द्यायला निघाले श्रीहरीचा भीमेच्या तीरी 

असे अनोखे मिलन आपले सदैव राहावे सृष्टीमधे 

करावे मजला तृप्त नित्यनेमाने ,देवा नित्यनेमाने,


निशिकांत हारुगले



















































लावणी गीत

 

लावणी गीत...


घन घन. माला दाटली नभात,

टप टप टापा टाकीत आला

वरुणीराजा अंगणात.

मृग सरला अडद्रा गेली गेला पुनर्वसु,

पुष्याच्या पावसात चिंब चिंब भीजू.

रोप उगवून साळीची बाळसे धरावं आली ,

लागण कराव जमलो आम्ही मावळ पोरी.


आम्ही घाटोरी घाटोरी सह्याद्रीच्या मुली,

रोप लावीतो साळीची तांबड्या माती मधी.

कोकण  मुलखाचो  राजे वरूनी चालूनी आले ,

आले हो आले, कोकण मुलखाचो राजे,

त्याने धरील फेर आभाळ माथ्याले ,

थुई थुई पाणी रानात करायले.


बसव चाले रानात, लोणी घुसळे वावरात,

हिरवी सपानं दडल आमच्या मनात.

भाद्रपदात गवर रानात खेळुदे,

हिरव्या भाताची नागफणी रानात डोलू दे.


 नागफणी रानात रानात डोलेल,

रास धानाची धानाची खळ्यात रचेल.

महादेवाची देवाची कृपा होईल

आई लक्ष्मी लक्ष्मी कणगात भरेल.

 निशिकांत हारुगले



पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी. किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी. तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार. वाटले तुझ्या...