थाट पहावा मराठीचा प्रांता प्रांतातून,
अनेक उगवी बोल ते दहा कोसातून,
राहणे बाई माझे सागर शेजारात,सह्याद्रीच्या पश्चिम तिरात,
नासिक रंजन बोली ही , नथ बोले वरखाली होऊनी.
अशी आमची सुंदर कोकणची बोली,
मालवणच्या सिंधूदुग् पासून ठाणे करी.
थाट पहावा मराठीचा... ...l l
अपरांत देशातून निघालो पूर्वेच्या कडा
नांदण्या मराठी निघाली घाटाच्या देशा,
तलवारीची जात माझी मी दिसते नाजूक,
भगवी पताका फडकते कुंतल देशात,
घाटीचा हा थाट पहावा रांगड्या मुलखात,
शिवशाहीचा भगवा डोलावा सह्याद्री शिखरात.
अशी आमची सुंदर साजिरी घाटोरी बोली,
मलप्रभे पासून नांदते भीमेच्यातीरी.
उभी राहते मी हो बाई शाळूच्या रानात,
देवगिरीचा किल्ला शोभे मराठवाड्यात,
घडावा कलेचा साज बाई पैठणी शालुवरती,
अशमक खोऱ्याची आहे मी महाराणी.
अजंठा वेरूळ ची कला पहावी गोदेच्या खोऱ्यात,
अशी सुंदर साजिरी बाई मराठवाडी बोल
तूरा खोवतो मानाचा किल्ले देवगिरीवर
थाट पहावा मराठीचा... ... .ll
झुळ झुळ वाहे पाणी तापी पूर्णेचे,
केळयांची बाग बहरली जळगाव प्रांते ,
बहिणाईची गीत सांगती मराठीचा ढंग,
मराठीचे उत्तर टोक अहिराणी बोल,
तापी पूरणेच्या पाण्याचा पडावा मुक्तनगरी वळसा,
चांगदेव मुलखाचा थाट पहावा अहिरान खानदेशा.
अशी सुंदर साजिरी अहिराणी बोल,
मराठीचा तुरा खोवते बऱ्हाणपूर सीमेवर
थाट पहावा मराठीचा... ...ll
सातपुड्याच्या मुली नांदती विदर्भ खोऱ्यात
वैना वर्धाचे सुंदर खोरे चंद्रपुरात,
धानाची ती पात डोलते भंडार प्रांती,
कपाशीची बोंडे खुलती नागपूर देशी,
नांदते बाई मी रूक्मिनीच्या माहेरी,
मराठीची लाडकी लेक माय मी वऱ्हाडी.
थाट पहावा मराठीचा... ...ll
नांदते मी अपरांतपासून विदर्भ प्रदेश
कुंतल पासून थेट अश्मक देश
गावरान बोल जरी वाटती अहो आम्ही ग्रामवासी
मराठीच्या आम्ही मुली नांदतो महाराष्ट्र राज्यी
थाट पहावा मराठीचा... ...ll
निशिकांत हारुगले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा