if (typeof document.onselectstart != "undefined") { document.o

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी.

किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी.


तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार.

वाटले तुझ्या सारखा विश्वासू , न मिळेल मज जोडीदार.


जाऊ भटकू रानामध्येे , दूर दूर मैदानावर.

आपली मैत्री जमेल पक्की,  जसे धरणी आकाश क्षितिजावर.


आकाशीचा फिरता वारा , आहे खट्याळ फार.

तुला सांगेल  जाऊ दूरवर, फिरत फिरत गगनपार .


एके दिवशी अवचित घडला,  एक चमत्कार.

मैदानाच्या अंगणात, तुज भेटला साथीदार.


तुज म्हणाला कैदी होऊन, कशाला भोगतोस तुरुंगवास.

दुसऱ्याच्या हातची कठपुतळी होऊन, नाचत जाईल आयुष्यपार


चल एकमेका मदतीने तोडू बंधने ,

मुक्त होऊन फिरत राहू, आकाशाच्या सदने.


साथी मिळताच तू तोडला मैत्रीचा अपुला धागा .

मज सोडून निघालास आकाशीच्या अंगणा.


 तू पण निघालास स्वार्थी माझ्या सवंगड्यांपरी.

मज सोडून निघून गेलास दूर गगनापरी .


गेलास म्हणून नाही खचनार मी .

माझे आयुष्य आनंदाने जगणार मी.


निशिकांत हारुगले


सत्याचा सूर्य

 सारीपाट हा संसाराचा खेळ चालला नशिबाचा,

माणसाच्या या जगामध्ये डाव मांडतो जीवनाचा.


गोल गोल फिरत्या जगामध्ये न मिळे स्थिर कुणी,

क्षण येतो क्षण जातो धावती सर्व चाकोरीतूनी. .


मिळाला न मज जीवनी कोणी सखा कायमी,

स्वार्थाच्या या जगामध्ये सर्वच विसरले माणुसकी.


वसुंधरेवर राहुनी स्वप्ने पाहतो गगनाची, 

घेऊनी आकाशी भरारी करत रहावी मुक्त स्वारी.


जन्मा आलो राबत गेलो गेली काया झुरत, 

स्वार्थी जगात पाहतो माणुसकी राहिली आहे का परत.


एकास दुजा शेंड्या लावतो जगाच्या व्यवहारात,

पण फसविणारा स्वतःच फसतो स्वार्थाच्या बाजारात.


दिस उगवे दिस बुडे रात्री चालल्या सरत,

मानवी स्वार्थी दुनिया चालली गोल गोल फिरत. 


दिवस येईल एक असा सरेल अंधकार,

सत्याचा सूर्य प्रकाश उजळून दिसेल क्षितिजपार.

निशिकांत हारुगले 

जीवन

 जीवनाचा आनंद लुटूया आपण सारे,

बेधुंद तरुणाईचे पिऊया आपण वारे.


भूवरी राहून उडूया आकाशामध्ये,

सुंदर पाखरु होऊन दाखवू जगा दिवास्वप्ने.


अशी तरुणाई चिरकाल टीकत जावी,

आयुष्याच्या वाटेवर सतत फुलत रहावी.


तरुणाईच्या वाटेवरी मिळावा एक साथी,

त्याने साथ द्यावी मित्र होऊन हाती.


जीवनी जीवन फुलत जावे  गुच्छाप्रमाणे,

तयाचा सुगंध पसरावा कस्तुरीप्रमाणे.


वेड्यावाकड्या जीवनाच्या पाऊल वाटा,

एकमेकां साथीने चालुया आता चला .


कसे होऊन बेभान पाखरू फिरते नभात रे,

तशी घेऊ भरारी जाऊं उंच गगनात रे .


चला उंच उंच चढू यशाच्या वाटा ,

आडवे येणाऱ्यांचा काढत जाऊ काटा.


किती गेलो  उंच यशाच्या शिखरी,

तरी विसरणार नाही  माणुसकी.


निशिकांत हारुगले




रास

 आकाशी चांदवा प्रकटला कोजागिरी पूनवेचा ,

अम्हासवे टिपऱ्या खेळतो नाथ पंढरी नगराचा.


भिमेतीरी जमली वैष्णव मंडळी,

आम्हीं भोळ्या मराठमोळ्या पोरी .


आम्हा फसवू पाहू नको तू केली गोकुळात चोरी,

गोडगोड बोलून लोणी खाऊन केलीस शिरजोरी .


दिसतोस सावळा, साळसूद भोळा, आहेस रे लबाड .

आम्हा गोपींजवळ बागितलेस तू दूधा लोण्याचे घबाड .


वाजवून पावा प्रेमाचा चाळा फसवतोस तू सर्वांना ,

असेच फसवून वरीलेस तू,  आमच्या भोळ्या रुक्मिणीला.


रुसला  ग नाथ वाटत बाई,  आमच्या कडू बोलण्याला .

चला समजूत काढू त्याची, खेळूनी रासलीला .


वाजावा सुमधुर पावा बाई भीमेच्या रणात,

रास रंगावा टिपऱ्या टाळा सवे पंढरीत .


कानात कुंडल डोईत मोरपीस दिसतो साजिरा सुंदर

देखणा ग बाई गोजीरा , आमचा रमेचा वर,


भरीले रांजण दुधाचे बाई त्याने प्रेमाच्या सागरात ,

प्रेमाची भरती आली  हो भामाबाईला ,


रासाच्या रंगात दुधाच्या रांजनात उतरला चांदवा नभीचा,

लुटुया क्षीराचा आनंद कोजागर पूनवेला.

निशिकांत हारुगले


नवनीत

 घुसळनी तू घुसळनी तू रांजण गाज गाजे,

उसळी घेत वरती खालती ताक ते हो बोले. 


कुठे लपला आडोशाला तो श्याम सावळा,

त्याची वाट पाहतो रांजणी नवनीताचा गोळा.


कशी रवी फिरते दोरी साथीने रांजणात,

वेडी झाली ही राधा नंदकुमाराच्या प्रेमात.


कृष्णकुमाराचा पावा गोकुळात वाजतो ,

कपिलेंचा कळप यमुनातिरी चरतो.


कपिलेची धार दोन्ही करांनी  काढावी,

क्षीराच्या धारेने मडकी भरून रहावी.


अशी क्षीराची धार दह्यात बदलत जावी .

पांढऱ्या पांढऱ्या दह्यात नीरधार मिसळावी,


गोल गोल रवी त्यात अशी फिरावी,

नवनीताचे भांडार वरती घुसळून यावी.


उचल तो गोळा राधे ठेव शिंक्याला, 

त्यावर गोकुळाचा चोर टपून ग बसला. 


गोळा ठेवून शिंकी राधा गेली पाण्याला,

माजदारान येऊन डाका त्याने घातला . 

कोठीतून राधेचे श्रम चोरून गेला.


चोरी नाही केली मी म्हणे श्रीकृष्ण ग सावळा,

कपिलेच्या राखणीची राखोळी मी वाटी सवंगड्यांना.

निशिकांत हारुगले

वातचक्र

 गर गर गर आला गोल गोल फिरत,

पवन देव घुमतो धरणी आकाशाच्या मध्यात.


त्याच्या बरोबर खेळाया गेली पाने फुले,

वातचक्राचा आनंद पाहतो , आम्ही लहान मुले .


कपडालत्ता ही त्यात आला सर्व कचरा,

त्याच्या सवे मारतो धुरळा गोल गोल चक्करा.


मोठं मोठाली झाडे लागली त्यासवे डोलाया,

डोलून लागली त्यांना भोवळ माराया.


पाणाड्याचा पाणचक्का उडूनी गेला त्यात,

जाऊन पडला मेसाच्या उंच गेचक्यात.


रुईच्या झाडावरची आजी त्यात गेली,

गोल गोल फिरत गाणी म्हणायला लागली.


वातचक्र गेला चिडून गावाच्या मध्यात , 

घरोंद्याची कौल घेऊन आला परत.


सगळी माणसे इकडे तिकडे पळायला लागली,

वेड्यासारखी चहूकडे करायला लागली.


वातचक्र म्हणाले ,"चला मुलांनो संगे."

जाऊ गोल गोल फिरत आकाशीच्या सदने,


मुले म्हणाली वातचक्रा नको तुझी संगत.

आम्ही मुले आनंदी आहोत धरणी मातेच्या कुशीत.

निशिकांत हारुगले

प्रेम



हृदयदी भाषा ते हृदयची जाणते,

प्रीत ही माझी तुझवर येऊनी थांबते .

कसले हे अमोघ बंधन आहे ना ,

सारे म्हणतात ते प्रेम हेच का.


नयनातूनी जुळवी ते अनोखे बंध ,

कुसुमातुनी पसरावा प्रीतीचा सुगंध .

तसे दळवळावे आपले जगात जीवना,

प्रेम म्हणतात ते हेच का?


अणु अणु मधूनी घडावे विश्व ,

चरा चरातून जोडत जाई अनुबंध ,

अग्नीत जाळूनी दाखवावे अमरत्व .

दिपावरील श्रेष्ठ पतंग्याचे हे प्रेम .

कसले हे बंधन प्रेमा?

सारे म्हणतात ते प्रेम हेच का?


कसा सुटावा विपणी सुगंध कस्तुरीचा ,

वेड लागूनी धावावा मृग तो मनीचा ,

अंत करून सोडते तेच का ?

शेवट हा प्रेमाचा असा का ?


वेड लावते पद्मज कृष्ण वर्णी भुंग्याशी,

जाळ्यात अडकुनी आपल्या स्पंदने घेई हृदयाची.

काष्ट फोडणारा अडके नाजूक बंधासी ,

गुदमरून जाऊन देई बाजी प्राणांची .

असले कसले हे बंधन प्रेमा ?

शेवट व्हावा जगण्याचा असा का ?


प्रेम नव्हे जगणे नी मरणे ,

प्रेम त्यागाच्या यशाचे आहेत निखारे ,

प्रेमातून वाढे वंश जीवनाचे ,

नव्हे वासनेचे बंध प्रेमा?

त्यागाने येई अमरत्व प्रेमाला.


निशिकांत हारुगले








पतंग मैत्री

  तुझे पाय लागले आभाळी, मी नाचतो धरणीवरी. किती घेशील गरगर गिरक्या, तुझी वेसण  माझ्या करी. तूच माझा अबोल सखा , बालपणीचा साथीदार. वाटले तुझ्या...